Saturday, May 25, 2024

/

वाढदिवसा निमित्त ‘यांनी’ राबविला स्तुत्य उपक्रम-

 belgaum

श्रीराम सेना व हिंदूराष्ट्र सेनेचे बेळगाव प्रमुख रविकुमार दादा कोकितकर यांनी आज आपला 47 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करताना रस्त्याकडेला झाडाखाली ठेवलेले हिंदू देव -देवतांचे फोटो एकत्रित करून विसर्जित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.

घरातील हिंदू देव -देवतांचे जुने झालेले किंवा क्षतिग्रस्त झालेले फोटो कचर्‍यात फेकून देणे गैर असल्यामुळे बहुतांश नागरिक असे फोटो सार्वजनिक ठिकाणी एखाद्या झाडाखाली ठेवून देतात. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे घरातील देवदेवतांचे फोटो बेवारस टाकणे हेदेखील तितकेच चुकीचे आहे.

या प्रकाराला आळा करण्यासाठी आवाहन केले जात असले तरी ते थांबलेले नाही. यासाठी श्रीराम सेना व हिंदूराष्ट्र सेनेचे बेळगाव प्रमुख रविकुमार दादा कोकितकर यांनी आज आपल्या 47 व्या वाढदिवसानिमित्त शहरातील रस्त्याकडेला, झाडाखाली, मंदिरानजीक, फूटपाथ कडेला अशा विविध ठिकाणी बेवारस अवस्थेत पडून असलेले देव -देवतांचे फोटो संग्रहित करून त्यांचे विसर्जन केले.

 belgaum

यापद्धतीने आपला वाढदिवस सत्कारणी लावणाऱ्या रवीकुमार कोकितकर यांनी देव -देवतांचे फोटो गोळा करण्यासाठी चार चाकी वाहनच दिमतीला घेतले होते.

या सामाजिक कार्यासाठी त्यांना श्रीराम सेना आणि हिंदू राष्ट्र सेनेचे अजित पाटील, सचिन तुप्पट, विनायक हंगिरगेकर, संतोष जाधव, गजानन अगसगेकर व परप्पा सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.