गेले दोन दिवस होत तिलारी आणि राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पडत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे.ओव्हर फ्लो होण्यासाठी केवळ दोन फूट शिल्लक आहे त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी जलाशयाचे दरवाजे ५ दरवाजे एकेक फुटांनी उघडण्यात आले आहेत.
राकसकोप जलाशयाच्या पत्रामध्ये येणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे .पावसाचा जोर अखंडपणे सुरू असल्यामुळे मार्कंडेय नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. धरणाच्या क्षमतेपेक्षा येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक आहे.
राकसकोप जलाशयाची क्षमता २४८२.०० इतकी आहे सध्या डॅम २४७७.६० इतके भरले आहे जलाशय तुडुंब झाल्याने पाच गेट उघडण्यात आले आहेत.
बेळगाव शहराला पिण्याच पाणी पुरवणाऱ्या राकसकोप जलाशय 30 जुलै २०१९ रोजी पाहिलांदा ओव्हर फ्लो झाले होते त्यानंतर मागील वर्षी 2020 मध्ये 6 आगष्ट रोजी ओव्हरफ्लो झाले होते यावर्षी 22 जुलै रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
राकस्कोप जलाशय परिसरात गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे.
मागील वर्षी 6 ऑगस्ट रोजी सदर जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. मात्र यंदा आज 22 जुलैलाच हे जलाशय तुडूंब झाले आहे. जलाशय पूर्णपणे भरण्यास 2 फूट शिल्लक असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाणी पुरवठा खात्याने जलाशयाचे दोन दरवाजे 5 इंचानी खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.