Monday, April 29, 2024

/

अखेर पीडब्ल्यूडीला आली जाग- फलक बसवला

 belgaum

सरकारी काम सहा महिने थांब याची प्रचिती बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या अनेक खात्यांची झाली आहे. देसुर ग्रामस्थांनी स्व खर्चातून बसवलेला फलक अज्ञातांनी काढल्यावर तणाव निर्माण झाला होता त्या नंतर पीडब्ल्यूडीला जाग आली त्यांनी शासकीय दिशादर्शक फलक बसवला आहे.

गेले कित्येक महिन्या आधी निवेदन देऊन सुद्धा दिशादर्शक फलक न बसवल्याने देसुर येथील युवकांनी स्व खर्चातून फलक बसवला होता काही मराठी द्वेष्ट्यानी तो फलक उखडून टाकला होता त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याची दखल घेत शासनाने शुक्रवारी नवीन फलक उभा केला आहे.

सुळगा -येळ्ळूर क्रॉस येथील मराठी भाषेतील दिशादर्शक फलकाची गेल्या शनिवारी रात्री अज्ञातांकडून नासधूस करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर जि प सदस्य रमेश गोरल यांनी पुन्हा एकदा केलेल्या विनंतीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे त्या दिशादर्शक फलकांच्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकृत दिशादर्शक फलक बसविण्यात आला आहे.Sulga desur board

 belgaum

बेळगाव आणि इतर भागातून राजहंस गड व खानापूरकडे जाणाऱ्या लोकांची नेहमीच येळ्ळूर -सुळगा मार्गे वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणता रस्ता कोठे गेला आहे याची माहिती मिळावी आणि त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने सुळगा -येळ्ळूर क्रॉस येथे मराठी भाषेतील दिशादर्शक नाम फलक बसविला होता. मात्र मराठी भाषेचा पोटशूळ उठलेल्या कांही समाजकंटकांनी गेल्या शनिवारी रात्री या फलकाला रंग फासून नासधूस करण्याद्वारे तो उचकटून फेकून दिल्यानंतर सोमवारी सकाळी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या नेतृत्वाखाली नासधूस करण्यात आलेला दिशादर्शक फलक पुन्हा पूर्ववत आहे त्या जागी बसविण्यात आला होता. त्याच दिवशी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर करून अधिकृत कायमस्वरूपी दिशादर्शक फलक बसविण्याची विनंती केली होती.

या विनंतीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) आता सुळगा -येळ्ळूर क्रॉस येथे कायमस्वरूपी अधिकृत दिशादर्शक फलक बसविला आहे. विशेष म्हणजे कन्नडसह मराठी भाषेत गावांच्या नावांसह हा दिशादर्शक फलक बसविण्यात आल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच जि. पं. सदस्य रमेश गोरल यांना धन्यवाद दिले जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.