Monday, January 13, 2025

/

न्यायालयासमोरील गतिरोधक गेले उखडून

 belgaum

जे एम एफ सी न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक बसविले होते. मात्र हे गतिरोधक काही दिवसातच उखडून गेले आहेत. त्यामुळे वकील वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या ठिकाणी वारंवार गतिरोधक बसविण्यात येतात. मात्र ते योग्य पद्धतीने आणि निकृष्ट दर्जाचे बसविण्यात आल्याने काही दिवसातच ते उखडून जात असतात. सध्या कोरोना काळात काही प्रमाणात न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

न्यायालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना अपघात होऊ नये यासाठी गतिरोधक यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हे गतिरोधक कुचकामी ठरत आहेत. ही समस्या वारंवार उद्भवत असून येथे दर्जेदार गतिरोधक बसविण्याची मागणी वकील वर्गातून होत आहे. न्यायालय आवारात ये-जा करण्यासाठी पक्षकार वकील आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या प्रमाणात धावपळ करत असतात. कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये यासाठी गतिरोधक यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र गतिरोधक असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे योग्य प्रकारे गतीरोधकांची निर्मिती करावी आणि अपघात टाळावेत अशी मागणी होत आहे.Speed breaker

कोरोणा काळानंतर आता हळूहळू न्यायालयीन कामकाज सुरु झाले आहे. दरम्यान येथे गर्दी वाढू लागली आहे. पक्षकार आणि वकील यांना काही प्रमाणात न्यायालयात जाण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे.

त्यामुळे गर्दी होत आहे. वर्दळ वाढत असतानाच येथील बसविण्यात आलेल्या गतिरोधक त्यांची अवस्था गंभीर झाली असून त्यांची दुरुस्ती अथवा वैज्ञानिक व दर्जेदार पद्धतीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.