बेळगाव उत्तर मतदारसंघात 1400 घरांना मंजुरी मिळाली असून प्रधान मंत्री योजनेतून ही घरे मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली.
गुरुवारी बंगळुरू मुक्कामी त्यांनी गृह निर्माण मंत्री भेट घेतली त्यावेळी मंत्र्यांनी त्यांना उत्तर बेळगावात इतकी घरे मंजूर केल्याची माहिती दिली आहे.
बेळगावात अनेक जण निराश्रित आहेत याकरिता त्यांना घरे मिळवून देणार देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री योजनेतून घरे मंजूर करण्याची विनंती केली. गृहनिर्माण मंत्री व्ही.सोमान्ना यांनी रुक्मिणी नगर ,रामनगर , वड्डरवादी,नेहरू नगर, ढोर गल्ली या ठिकाणी अरे मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे .लवकरच याची कार्यवाही सुरू होणार आहे असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
कामगार कार्डधारकांना लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे कीट देणार :
व्ही सोमन्ना यांच्या सह बेनके यांनी कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांचीही भेट घेतली होती. हेबाबर यांच्याशी त्यांनी कामगार कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या किट वितरणासंदर्भात चर्चा केली.
सरकारकडून कामगार कार्डधारकांना किट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र हे किट कामगार कार्डधारकांपर्यंत पोहोचलेले नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे हे किट त्वरित कामगार कार्डधारकांना मंजूर करावेत, अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी मंत्री शिवराम हेब्बाळ यांच्याकडे केली. शिवराम हेब्बाळ यांनी आमदार अनिल बेनके यांचे म्हणणे ऐकून घेऊन, ज्या कामगार कार्डधारकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळालेले नाही, त्यांच्यासाठी किट त्वरित मंजूर करण्यात येतील असे सांगितले.