वारकरी महासंघाचे अध्यक्ष गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी रद्द केल्या बद्दल वारकरी समाजाच्या वतीनं शासनाचा निषेध व्यक्त केला.
सरकारचे सर्व नियम पाळून नामदेव मंदिर खडे बाजार बेळगाव येथे झाली. यावेळी संतवीर ह.भ.प.बंडातात्या भ-हाडकर यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करण्याकरिता देखील सर्व वारकरी जमले होते .
वारी ही 700 वर्षाची ही चाललेली परंपरा या सरकारने आदिल शाली काळात सुद्धा बंद नव्हती ती या नास्तिक सरकारने बंद केली ह.भ.प.बंडातात्या भ-हाडकर सारे नियम पाळून 10 माणसाने वारीला जातो असे सांगून सुद्धा त्यांनाच अटक करून नजर देत ठेवले. या अटकेचा निषेध या बैठकीत करण्यात आला.
बंडातात्या एक ब्रह्मचारी आहेत, व्यसन मुक्त समाज निर्माण केला एक आदर्श जीवन व्यतीत करणाऱ्यांना अटक करणे हे फार मोठी चूक या सरकारने केली असे सांगत यावेळी निषेध मांडला.यावेळी ह .भ. प .बाबली महाराज ह. भ. प. संदीप पाटील नेसरी ह. भ .प .सोमनाथ भावे नामदेव मंदिराचे व वारकरी समाज उपस्थित होते.