Thursday, May 2, 2024

/

उपमुख्यमंत्री पुत्राच्या कारच्या ठोकरीत एकाचा बळी

 belgaum

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी यांच्या कारने धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला .हा अपघात बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील कुडल संगम क्रॉस जवळ झाला .अपघातानंतर मृताच्या नातेवाईक आणि स्थानिकांना चिदानंद सवदी यांनी धमकीही दिल्याचे समजते.

चित्रदुर्गा- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर कुडल संगम क्रॉस जवळ झालेल्या या अपघातात मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाला. कुडलेप्पा मोळी (वय 58)रा चिक्कहंडरगल, ता. बागल कोट असे मृताचे नाव आहे.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला बागल कोटच्या खासगी इस्पितळात दाखल केले होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. मृत कुडलेप्पा काल सायंकाळी शेतातून घरी परतताना हा अपघात झाला .मंत्री पुत्र चिदानंद याची एमजी गोल्ड स्टार कंपनीची के -ए 22 एमजी 5151क्रमांकाची ही मोटार विजापूरकडे चाललेली होती .अपघातानंतर जखमीला इस्पितळात नेण्याऐवजी आपल्या कारचा नंबर प्लेट ची मोडतोड करून कागदपत्रे घेऊन दुसऱ्या वाहनातून जाण्याच्या तयारीत चिदानंद सवदी होते मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडून ठेवत तिथेच बसवून ठेवले यावेळी चिदानंद यांनी मी उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. अशी धमकी दिल्याचेही समजते चिदानंद हे स्वतः च कार चालवत होते असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

 belgaum

चिदानंद आपल्या 12 मित्रांसमवेत हम्पी ,होस्पेट, अंजना द्री बेट्टासह राज्यातील विविध ठिकाणी 2 गाड्या मधून फिरायला गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले ,या अपघातामुळे मला दुःख झाले आहे .अपघात ग्रस्त कार मध्ये माझा मुलगा चिदानंद नव्हता .खरे सांगायचे तर माझ्या मुलाला कार चालवता येत नाही .मंत्र्याचा मुलगा म्हणून हा विषय उगाच वाढवत येत आहे .दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या माझ्या मुलाने जखमीला इस्पितळात दाखल केले आहे .मीच उद्या मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे .त्यांच्या समवेत आम्ही आहोत.

दरम्यान ,अथणी येथे पत्रकाराशी बोलताना चिदानंद सवदी यांनी ,अपघातस्थळी स्थानिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे .अपघात झाला त्या कारमध्ये मी बसलो नव्हतो ,मोटार सायकल स्वार अचानक आडवा आल्याने हा अपघात झाला. चालकाने कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. मृतांच्या कुटुंबीयांना साह्या करण्यासाठी मी तयार आहे ,असे त्यांनी सांगितले.

चिदानंद सोडून चालक हनुमंत सिंग नामक एकाच्या नावाने हुनगुंद पोलिसात तक्रार दाखल झाली आहे .एकंदर एका जबाबदार उपमुख्यमंत्र्याच्या मुलाने सामान्यांच्या जीवाशी असा खेळ करणे कितपत योग्य आहे असा सवाल केला जात आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करावी ,अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.