महिला आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार योजनेतील अंडी पुरविण्याच्या टेंडर मध्ये गैरव्यवहार आणि लाच देण्यात आल्याचा आरोप करून महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि गंगावतीचे आमदार परण्णा मुनवळी यांच्यासह एकूण चार जणा वर लोकायुक्त पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सुरेंद्र उगारे यांनी बेळगावातील लोकायुक्त पोलीस वरिष्ठ अधिकारी यशोदा वंटगुडी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.मंत्र्यांचे सहाय्यक संजय अर गे आणि प्रशांत घाटगे यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मंत्र्यांचे स्विय सहाय्यक प्रशांत घाटगे यांनी आमदार परण्णा मुनवळी यांची मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घडवून आणली.यावेळी मंत्र्यांनी आमदारांच्या कडे एक कोटी रुपये आणि महिन्याला तीस लाख रुपये द्यावेत अशी मागणी केल्याची बातमी उघड झाली आहे.
शिवाय संजय अरगे यांनी तीस लाख रुपये घेतले आहेत असे लोकायुक्त पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांनी बेळगाव जिल्ह्याचा पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता.त्यावेळी मंत्री शशिकला जोल्ले आणि त्यांचे पती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची अनुपस्थिती मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान जाणवली.