Friday, May 3, 2024

/

दरड कोसळल्याने रेल्वे डबा रूळावरून घसरला

 belgaum

संततधार पडणार्‍या प्रचंड मुसळधार पावसामुळे नैऋत्य रेल्वे हुबळी विभागाच्या रेल्वे मार्गावर दूधसागर -सोनोलीम आणि करंजोळ -दूधसागर या रेल्वे स्थानकादरम्यान आज सकाळी अनुक्रमे 6:10 आणि 6:20 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

मंगळूर जंक्शन -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस रेल्वे क्र. 01134 ही चिपळून आणि कामठे दरम्यान वशिष्ठी नदीला पूर आल्याने मडगाव, लोंढा, मिरज मार्गे वळविण्यात आलेली रेल्वे दूधसागर -सोनोलीम दरम्यान दरड कोसळल्याने रुळावरुन घसरली. दरड कोसळल्याने या रेल्वेचा इंजिनला लागून असलेला जनरल कोच आणि इंजिनचा कांही भाग रुळावरून खाली उतरला होता. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही. दरडीमुळे ही रेल्वे पुन्हा माघारी कुलेमला खेचून नेण्यात आली.

त्याचप्रमाणे हजरत निजामुद्दीन -वास्को-द-गामा स्पेशल एक्सप्रेस रेल्वे क्र. 02780 हीच्या मार्गावर करंजोळ -दूधसागर दरम्यान दरड कोसळल्यामुळे ही रेल्वे पुन्हा माघारी कॅसलरॉकला खेचून नेण्यात आली. रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच कॅसलरॉक आणि वास्को-द-गामा येथून तात्काळ अपघात मदत रेल्वे (एआरटी) घटनास्थळी धाडण्यात आली. रेल्वे क्र. 01134 या रेल्वेगाडीत 345 प्रवासी, तर रेल्वे क्र. 02780 या रेल्वेमध्ये 887 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.

 belgaum

या प्रवाशांची कॅसलरॉक आणि कुलेम रेल्वे स्थानकावर चहा आणि उपहाराची सोय करण्यात आली होती. तसेच पुढील प्रवासासाठी त्यांच्याकरिता बसेसची सोय देखील करण्यात आली होती.

पावसाळी मोसमात डोंगरातील घाट प्रदेशात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्या समस्येचे निवारण करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने नजीकच्या योग्य रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.