Tuesday, January 7, 2025

/

अनमोड रस्ता दुरुस्ती : आमदारांच्या इशाऱ्याचे ‘यांनी’ केले समर्थन

 belgaum

खानापूर ते रामनगर या अनमोड रस्त्याची पार दुर्दशा झाली असून वाताहत झालेला हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त न केल्यास आंदोलन छडण्याचा इशारा खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी दिला आहे. त्याचे खानापूर तालुका म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी समर्थन करून अनमोड रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.

खानापूर ते रामनगर हा अनमोल रस्ता गेल्या 1 -2 वर्षांपासून पूर्णपणे खराब होऊन त्याचे अक्षरशः खंडहर झाले आहे. सदर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्यामुळे सर्वत्र खाच-खळगे पडले आहेत. सध्याच्या पावसाळी मोसमात तर या रस्त्यावर पूर्णपणे चिखलाचे साम्राज्य पसरले असून कांही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण तर झालाच आहे शिवाय ठिकठिकाणी अवजड वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.Anmod road repair demand

सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खानापूर तालुका म. ए. युवा समितीने वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यासंदर्भात युवा समितीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी देखील पत्रव्यवहार करून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली आहे.

तथापि अद्यापपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही आता तालुक्याच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे समजते.

तसे झाल्यास फारच उत्तम, लोकप्रतिनिधींच्या आंदोलनामुळे तरी संबंधित खात्याचे डोळे उघडून या रस्त्याची दुरुस्ती होईल आणि वाहन चालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा धनंजय पाटील यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.