Monday, November 18, 2024

/

…अन् माणुसकीच्या भावनेतून ‘यांनी’ पार पाडले अंत्यसंस्कार

 belgaum

हलाखीच्या परिस्थितीतील पत्नी आणि पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून गोकाक येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या आणि उपचाराचा फायदा न होता मृत्युमुखी पडलेल्या एका इसमावर हेल्प फाॅर नीडीने माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्कार केल्याची घटना आज घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल रमेश कुंभार (रा. चिक्कबसापुर, ता. बाडगी, जि. हावेरी) हा इसम गेल्या 18 जुलै रोजी गोकाक पोलीस स्थानक व्यक्तीतील एका बारनजीक जखमी अवस्थेत पडला होता. ओळख न पटल्यामुळे पोलिसांनी त्याला गोकाक सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा फायदा न होता गेल्या 24 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सदर इसमाची ओळख पटण्यासाठी गोकाक पोलिसांनी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर माहिती प्रसिद्ध केली होती.Funeral

सदर माहितीच्या आधारे मयत इसमाची पत्नी आज सकाळी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे आली. तिने दिलेल्या माहितीनुसार मयत इसम तिचा नवरा असून त्याचे नांव अनिल रमेश कुंभार असल्याचे स्पष्ट झाले. कुंभार दांपत्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आपण अक्षरशः उसनवार पैसे घेऊन बेळगावला आलो असल्याचे अनिलच्या पत्नीने सांगितले.

पतीच्या अंत्यसंस्कारासाठीच नव्हे तर घरी माघारी गावी जाण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नाहीत असे तिने स्पष्ट केले. तेंव्हा पोलिसांच्या विनंतीवरून हेल्प फाॅर नीडीच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीच्या भावनेतून स्वखर्चाने मयत अनिल कुंभार याच्यावर अंत्यसंस्कार करण्याबरोबरच त्याच्या पत्नीला माघारी गावी पाठवण्याची व्यवस्था देखील केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.