बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या जून महिन्याअखेर सर्वाधिक 505.6 मि. मी. पावसाची नोंद खानापुर पर्जन्यमापन केंद्रात झाली असून सर्वसामान्य सरासरीपेक्षा खानापुरात 34.47 टक्के जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्वच पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी जूनमधील सर्वसामान्य सरासरी पावसापेक्षा यंदा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
बेळगाव सरकारी विश्रामधाम येथील पर्जन्यमापन केंद्रामध्ये जूनमध्ये 240 मि. मी. इतक्या सर्वसामान्य पावसाची नोंद होते. मात्र यंदा जुनअखेर या ठिकाणी 334.7 मि. मी. पाऊस नोंदविला गेला असून जो सर्वसामान्य सरासरीपेक्षा 39.46 टक्के जास्त आहे.
खानापुर पर्जन्यमापन केंद्रांमध्ये सर्वसामान्यपणे 376 मि.मी. पावसाची नोंद होते मात्र यावेळी 505.6 मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्रात काल 30 जून 2021 पर्यंत नोंदविला गेलेला पाऊस (अनुक्रमे तालुका केंद्र, जूनमधील सर्वसामान्य पाऊस, 18 जूनपर्यंत नोंदविला गेलेला पाऊस आणि टक्केवारी या पद्धतीने) खालील प्रमाणे आहे.
अथणी : 78 मि.मी., 167 मि.मी., 114.10 टक्के. बैलहोंगल : 89 मि.मी., 235.7 मि.मी., 164.83 टक्के. बेळगाव आयबी : 240 मि.मी., 334.7 मि.मी., 39.46 टक्के. चिक्कोडी : 86 मि.मी., 220.9 मि.मी., 156.86 टक्के. गोकाक : 69 मि.मी., 149.6 मि.मी., 116.81 टक्के. हुक्केरी : 102 मि.मी., 278.2 मि.मी., 172.75 टक्के. कागवाड : 102 मि.मी., 182.6 मि.मी., 79.02 टक्के.
खानापूर : 376 मि.मी., 505.6 मि.मी., 34.47 टक्के. कित्तूर : 201.2 मि.मी., 285.8 मि.मी., 42.05 टक्के. मुडलगी : 79.1 मि.मी., 155.4 मि.मी., 96.46 टक्के. निप्पाणी : 159.5 मि.मी., 353.4 मि.मी., 121.57 टक्के. रायबाग : 72 मि.मी., 120.1 मि.मी., 66.81 टक्के. रामदूर्ग : 68 मि.मी., 160.7 मि.मी., 136.32 टक्के. सौंदत्ती : 87 मि.मी., 282.6 मि.मी., 224.83 टक्के.