बेळगाव ता. खानापूर कित्तूर राखील जंगल परिसरात अवैध शिकार करण्यासाठी येणाऱ्या तिघांना गोलिहळ्ळी(ता. खानापूर) वन विभागाच्या पथकाने पुणे बेंगलोर महामार्गावर सापळा रचून अटक केली .यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे 48 गावठी बॉम्ब, मृत ससा आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
बसवराज लकाप्पा बोरीमरद (वय 35), दुर्गापा भरमाप्पा बोरीमरद (26), सत्यापा यल्लाप्पा बुडरी (50,सर्वजण रा.करिकट्टी ता.बेळगाव )अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
गोलिहळ्ळी वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कित्तूर उपविभागातील जंगलात काहीजण शिकारीसाठी येत असल्याची खात्रीलायक माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली .
जिल्हा वनाधिकरी जी.पी. हर्षभानू ,नागरगाळीचे उपवनसंरक्षक अधिकारी सी.जी .मिरजी, गोलिहळ्ळीचे वनक्षेत्रपाल श्रीनाथ कडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे बंगळूर महा मार्गावरील तिम्मापूर गावाजवळ सापळा रचला दोन दुचाकीवरून येणाऱ्या संशयितांना आडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ मृत ससा व48 गावठी बॉम्ब आढळून आले या प्रकरणी आणखीन एका शिकाऱ्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईत उपवनक्षेत्रपाल संजय मगदूम, गिरीश मेक्कद ,अजीज,मुल्ला, प्रवीण धुळेप्पगोळ , तहसीलदार यांनी सहभाग घेतला.संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.वनक्षेत्रपाल श्रीनाथ कडोलकर व सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे.