बेळगाव सह 16 जिल्ह्याचा कोरोना पॉजिटिव्हिटी रेट 5 टक्क्या पेक्षा कमी आहे त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व दुकाने सायंकाळी पाच पर्यंत सुरू असतील अशी अनलॉकची घोषणा मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी केली.
क्लब आणि हॉटेल्स आणि व्यायामशाळा 50 टक्के सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रेक्षका विना मैदानी खेळ सुरू असतील.
वीकेंड आणि नाईट कर्फ्यु कायम असतील हा अनलॉक 21 जून पासून 5 जुलै पर्यंत लागू करण्यात आला आहे.50 टक्के बस सेवा लॉजिंग आणि रेस्टॉरंट सुरू असतील.
कोरोनाचे नियम पाळून खबरदारी घ्या असे आवाहन देखील मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केलं आहे
एकीकडे कर्नाटकात बेळगाव अनलॉक होत असताना गोव्यात मात्र 28 जून पर्यंत कर्फ्यू असणार आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची घोषणा केली आहे.शॉपिंग मॉल मधील दुकाने वगळता थिएटर सिनेमा मल्टिप्लेक्स आणि मनोरंजनाची साधने सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत सुरू असतील.मच्छी मार्केट देखील सुरू असेल