बेकायदेशीर रित्या एम आर पी पेक्षा अधिक दराने ब्लॅक फंगसला लागणारे इंजेक्शन विक्री करताना दोघा युवकांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील जवळपास 50 हजार किंमतीची लिफोलाईज एमफोडेक्स 50 एम जी इंजेक्शन जप्त केली आहेत.
ड्रग्स नियंत्रण अधिकारी आणि बेळगावच्या सी ई एन पोलिसांनी ही कारवाई करत दोघा जणांना अटक केली आहे व त्यांच्या जवळील 2 रेड मी मोबाईल आणि हिमाचल प्रदेश मध्ये तयार झालेली एमफोडेक्स लिफोलाईज 50 एम जी 28 इंजेक्शन व दुचाकी जप्त केली आहे.
पोलीस आयुक्त त्यागराज आणि डी सी पी विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सी ई एन पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर आणि ड्रग्ज नियंत्रण अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
तय्युब नईम मणियार वय 21 रा. मुधोळ तर मुजफ्फर आरिफ पठाण वय 22 रा.मुधोळ जिल्हा बागलकोट यांना अटक केली आहे.
ब्लॅक फंगस झाल्यास एमफोडेक्स लिफोलाईज 50 हे इंजेक्शन दिले जाते.ब्लॅक फंगसचा रुग्ण इस्पितळात दाखल होताच त्याच्यावर उपचार सुरू असताना इस्पितळाकडून सरकारकडे या औषधांची उपचार करणाऱ्या डॉक्टर द्वारा केली जाते सरकार कडून हे औषध सदर रुग्णाला पुरवलं जात बाहेर विक्री करण्यास यावर सध्या तरी बंदी आहे अशी औषध बाहेर विक्री करणे हा देखील गुन्हा आहे