जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उभारलेल्या तात्पुरते भाजी मार्केट मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्या सोडवा अशी मागणी करण्यात येत आहे.
सी पी एड आणि ऑटोनगर आर टी ओ मैदानावर शेड उभारून तात्पुरते भाजी मार्केट लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे काल पासून सुरू असलेल्या मान्सूनच्या जोरदार पावसाने आर टी ओ ग्राऊंडवर पाणी तुंबले आहे.
परिणामी अनेक ठिकाणी चिखल झाला आहे अश्यात व्होलसेल भाजी व्यापाऱ्यांना व्यापार करताना नाहक त्रास सहन लागत आहे इतकेच काय तर पावसात भाजी पाला भिजल्याने तो कुजला जात आहे खरेदीदाराना देखील याचे नुकसान सोसावे लागत आहे.
जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष घालून व्होलसेल भाजी मार्केटची समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे.