Friday, May 3, 2024

/

या शिक्षकाने केलाय गणितात संशोधन केल्याचा दावा

 belgaum

मुळचे मुचंडी ता.बेळगाव येथील रहिवासी आणि सध्या शिक्षण क्षेञात हुक्केरी तालुक्यातील हरगापुरगड सरकारी मराठी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे गणित शिक्षक पुंडलिक कुंडेकर यांनी गणितातील 15ची कसोटी आणि 20ची कसोटी नुकतीच शोधुन काढली आहे असा दावा त्यांनी केलाय

याआधी गणितामध्ये 2च्या कसोटी पासुन ते 12च्या कसोटी पर्यंत उपलब्ध होत्या. या कसोटींचा उपयोग शालेयपातळीवर तसेच स्पर्धात्मक परीक्षेत खूप उपयोग होतो. यापूर्वी 15ची आणि 20ची कसोटी उपलब्ध नव्हती.पण या कसोटीसाठी शोधत असताना साततच्या अथक प्रयत्नामुळे मला धवल यश मिळाले आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

या कसोटी शोधताना अनेक उदाहरणे सोडविण्यात आली. त्यानंतर अंतिम निर्णयात पोहचलो .यामुळे मला खरोखर आत्मानंद मिळाला .हे संशोधन कार्य केवळ माझे अध्यात्मिक महासद्गुरु परमाब्धि:कार प.पू.परमात्मराज महाराज यांच्या ज्ञानकृपा आशिर्वादाने साध्य झाले आहे.पुंडलिक फकिरा कुंडेकर हे मुचंडी येथील सिध्दारुढ हायस्कूल मध्ये सात वर्षे वेतनरहित गणित शिक्षक म्हणून उत्तम कार्य केले आहे.

 belgaum

सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई फकिरा कुंडेकर यांच्या हाताच्या कष्टाची जाणिव ठेवून अतिशय कष्टदायक परिस्थितीत पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले .त्यांच्या आईने अज्ञानरुपी निद्रेतून सज्ञानरुपी ज्ञान जगात जगण्याचा मार्ग दाखविला .

15ची कसोटी अशी आहे की कोणत्याही संख्येच्या सुटे स्थानात 5 किंवा 0 यापैकी एखादा अंक असेल आणि त्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज ही 3 च्या पटीत असेल तर त्या दिलेल्या संख्येला 15 ने नि:शेष भाग बातो .उदा.30,60,90,120,240, 360,810,840,930,1020,975 ,855 135 इ.तसेच 20ची कसोटी अशी आहे आहे की कोणत्याही संख्येमध्ये दशक स्थानात 2 आणि सुटे स्थानात 0 असेल तर त्या संख्येला 20 ने नि:शेष भाग जातो.असेही ते म्हणाले.

उदा.320,5920,6920,7520
या कसोटीचा वापर देखिल निश्चित गणितामध्ये उपयोग होईल अशी अशा वाटते. अशी माहीती गणित शिक्षक पुंडलिक कुंडेकर माहीती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.