ताशीलदार गल्लीतील अक्काताई महादेव बिर्जे या गरीब महिलेचे वयाच्या 73 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
अक्काताईचा एकुलता एक मुलगा विनायक बिर्जे हा 1992 च्या दंगलीत पोलिसांच्या लाठीमारात जखमी झाल्यानंतर कायमस्वरूपी अपंग,त्यामुळे तो काहीच करू शकत नाही.
पती निधनानंतर घरची परिस्थिती हलाखीची झाल्याने सुनबाई आणि स्वतः मोलमजुरी करून जिवन व्यथित करणाऱ्या अक्काताई बिर्जे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.
गल्लीतील नागरिक आणि नातेवाईकांनी जायंट्सचे विभागीय संचालक मदन बामणे यांच्याशी अंत्यसंस्कारासाठी मदत करावी अशी विनंती केली, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदाशिवनगर स्मशानभूमीत संपर्क साधून अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.
यासाठी लागलेला आर्थिक खर्च हा गरीब गरजूंसाठी सतत मदतीचा हात पुढे करणाऱ्या जायंट्स मेन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून ही संघटना गरिबांवर मोफत अंत्यसंस्कार केले जावे यासाठी प्रयत्नशील आहे पण अजूनही ही योजना कागदावरच असून महानगरपालिकेने लवकरात लवकर गरीबांसाठी मोफत अंत्यसंस्कार सुरू करावे अशी मागणी अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.