बेळगाव जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्हिटीचा दर शेकडा 5% पेक्षा कमी आला आहे त्यासाठी जिल्हा अनलॉक करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्स मध्ये मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी ही मागणी केली असून मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा याबाबत निर्णय घेणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिली.
बेळगावच्या जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्स वर पुरा विषयी माहिती संवाद साधला.
पाणी सोडण्याआधी महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून पूर्व कल्पना माहिती देण्यात येणार आहे असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक शासनाला कळवलं त्यामुळे शासनाला पूर नियंत्रणात मदत होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेळगाव सह इतर जिल्ह्यातील पुरा बाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यातील नदी नाल्यात पाणी यायला एक दिवस लागणार आहे त्यामुळे महाराष्ट्र मधून पाणी सोडण्या अगोदर एक दिवस माहिती मिळाल्यास बेळगाव जिल्ह्याला पूर नियंत्रण करण्यास मदत होणार आहे.
बेळगावच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या संपर्कात राहावे अश्या सूचना मुख्यमंत्री येडीयुरप्पा बेळगावच्या जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.