बेळगाव राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामानाने बिम्स आणि जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण उपचार घेत असतात.
कोविड काळात बिम्स मधील असुविधा आणि कर्मचाऱ्यांचा निर्लक्षितपणा यामुळे अनेकांचे टीकेचे लक्ष बनलेले इस्पितळ आणि तिथं काम करणारे कर्मचारी यामुळे जिल्हा प्रशासनाची छबी खराब झाली आहे.
बिम्स हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी यांनी पाहिले पाऊल उचलले आहे.या हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून वरिष्ठ आय ए एस अधिकारी आणि बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य विश्वास यांची नियुक्ती केली आहे.त्या बाबतचा आदेश आजच काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी अमलान आदित्य बिश्वास या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रशासक पदी नियुक्ती करून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. आय ए एस दर्जाचे अधिकारी बिश्वास आहेत तरी कोण आपण जाणून घेऊयात.
बिश्वास हे 1997 च्या बॅच चे आय ए एस अधिकारी असून अत्यंत कडक अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. ते बेळगाव प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावत आहेत. बिम्स हॉस्पिटलचा कारभार नक्कीच ते सुरळीत करतील असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत .
बळळारी येथे असताना त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या खाण माफियांना सळो की पळो करून सोडले होते.आजवर त्यांनी आपल्या सेवेत कोणाचाही राजकीय हस्तक्षेप सहन केलेला नाही.त्यामुळे बिम्स हॉस्पिटल वर सर्जरी करून तेथील कामकाजात सुधारणा घडवून आणतील.