Friday, September 13, 2024

/

खासदार मंगला अंगडी यांच्यासमोर बरीच आव्हाने

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत विजय झालेल्या भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा कार्यकाळ केवळ 3 वर्षाचा राहणार आहे. लोकसभेचा एकूण कार्यकाल पाच वर्षाचा असून त्यापैकी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नव्या खासदार श्रीमती अंगडी यांच्यावर आगामी 3 वर्षात केंद्र सरकारच्या योजना पूर्ण करण्याची जबाबदारी असणार आहे.

लोकसभा कार्य काळाच्या शिल्लक तीन वर्षांमध्ये केंद्राच्या योजनांना मूर्त स्वरूप देण्याबरोबरच मिळालेला विजय हा निसटता असल्यामुळे श्रीमती मंगला अंगडी यांना पक्ष बळकटीसाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. या पद्धतीने आगामी तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्यासमोर बरीच आव्हाने असणार आहेत.

दिवंगत सुरेश अंगडी हे सलग चार वेळा भाजपमधून लोकसभेवर निवडून गेले होते. 2019 मध्ये केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात खासदार अंगडी यांना रेल्वे राज्यमंत्री पद प्राप्त झाले होते. मात्र ही खासदारकी आणि मंत्रीपद त्यांनी केवळ दीड वर्षे भूषविले. त्यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.Mangla angdi

भाजपने सहानुभूती म्हणून त्यांची पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसतर्फे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढविली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत श्रीमती अंगडी यांनी निसटता विजय मिळवला असला तरी आता बेळगावच्या विकासाचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सुरेश अंगडी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बेळगावसाठी भरीव योगदान दिले होते.

बेळगावमध्ये 4 रेल्वे उड्डाणपूल, रिंग रोड बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासह बेळगावसाठी अनेक रेल्वेगाड्या त्यांनी सुरु केला. श्रीमती अंगडी यांनी आपण खासदार झाल्यास पतीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करू अशी ग्वाही निवडणुकीच्या वेळेस दिली आहे. आता त्यांच्या विजयामुळे मंत्री अंगडी यांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.