रेल्वे तर्फे दुपदरी रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.या कामासाठी रेल्वेने ड्रेनेजपाणी वाहून नेणारा नाला फोडल्याने दुर्गंधीयुक्त पाणी हजारो एकर शेतात पसरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.
उज्वल नगर, अमन नगर, गांधी नगर येथून येणारे ड्रेनेज मिश्रित नाल्याचे पाणी नाला फोडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतामधे असलेला भाजीपाला आणि अन्य पिके पाण्यात गेली आहेत.अगोदरच कोरोना मुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आणि आता ड्रेनेज मिश्रित पाणी शेतात पसरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
बेळगावचे शेतकरी आणी मारुती नगर ,गांधी नगरचे शेतकरी यांची शेती दुर्गंधीयुक्त पाण्यात गेली आहे.रेल्वे खात्याने नाला फोडल्याने नुकसान भरपाई द्यावी.
महानगरपालिकेने आणि रेल्वे खात्याने नाला बांधून बेळारी नाल्याला जोडावा अशी मागणीअजीत अनगोळकर,संजय मुदकंनावर,शीतल अनगोळकर आणि शेतकऱ्यांनी केली आहे.