belgaum

दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा पराभव करत बेळगावच्या खासदार पदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा त्यांनी 3986 मतांच्या फरकानं पराभव केला.

शेवटच्या एका तासात क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हर प्रमाणे बढत आणि पिछाडी सुरू होती अखेर अंगडी यांनी शेवटच्या एका तासात निर्णायक आघाडी मिळवत विजय संपादन केला.

bg

भाजपच्या मंगला अंगडी यांना 436868 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी त्यांना जोरदार टक्कर देत 432882 मते मिळवली.अपेक्षेप्रमाणे तीन मतदारसंघात प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांना 124648 मते मिळाली.

ही मते ठरली निर्णायक
मंगला अंगडी यांना माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात 27909 व बेळगाव दक्षिण मध्ये 22857 मतांची मिळालेली आघाडी सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली मात्र मागील लोकसभे पेक्षा भाजपच्या मतात भरपूर कमी आली आल्याने भाजपच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. अरभावी मध्ये 15743 तर बेळगाव उत्तर मध्ये 12759 आणि सौन्दत्ती मध्ये 16559 मतांची आघाडी मिळवत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी जोरदार टक्कर दिली.

शुभम शेळके यांना सव्वा लाख मते

लोकसभा पोटनिवडणूकित महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा उमेदवार शुभम शेळके यांनी 124648 मते मिळवत नवीन इतिहास रचला आहे मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. शेळके यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण बेळगाव मध्ये 44950 बेळगाव उत्तर मध्ये 24594 तर बेळगाव ग्रामीण मधून 45536 मते मिळवत दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा घाम काढला आहे.

बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील आर पी डी कॉलेज मध्ये रविवारी सकाळी 8 मतमोजणी सुरू झालो होती कोविड नियमावली यानुसार मतमोजणी सोशल डिस्टन्स वापर करण्यात आला होता.मतमोजणी केंद्रावर सकाळ पासूनच सतीश जारकीहोळी आणि मंगला अंगडी यापैकी कुणीही हजर नव्हते मात्र समितीच्या शुभम शेळके यांनी दोन तीन दा मतमोजणी फेरफटका मारला होता.

Vote counts bgm bypoll

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.