Sunday, April 28, 2024

/

18 वैद्यकीय संस्थांमध्ये उभारणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

 belgaum

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण घटावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तथापि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन राज्यभरातील 18 वैद्यकीय संस्थांमध्ये 22 ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या कर्नाटकात दररोज सुमारे 50 हजार कोरोना बाधितांची नोंद होत असून आठ जिल्ह्यांमधील मृतांची संख्या एक टक्‍क्‍यांच्या पुढे गेली आहे.

उपमुख्यमंत्री आणि राज्य कोविड-19 फोर्सचे प्रमुख सी. एन. अश्वथ नारायण यांनी राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

 belgaum

या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प बेंगलोरमध्ये असणार आहेत. या ऑक्सिजन प्रकल्पांसाठी वित्त विभागाने 62.7 कोटींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला असून निविदा मागविण्यात आल्या आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या या ऑक्सिजन प्रकल्पांमुळे ऑक्सीजन तुटवड्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असून कोरोनाग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सदर ऑक्सिजन प्रकल्पांमुळे संबंधित संस्था बाहेरील पुरवठादारांवर अवलंबून न राहता स्वतः ऑक्सिजन तयार करू शकतात. यापैकी प्रत्येक प्रकल्प प्रतिमिनिट 1500 लिटरच्या प्रहार दरासाठी डिझाईन केला जाईल आणि 250 व्यक्तींची ऑक्सीजन गरज भागविली जातील असे मंत्री अश्वथ नारायण यांनी सांगितले.

दरम्यान, ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याच्या या निर्णयाचे सार्वजनिक आरोग्य तज्ञ यांनी समर्थन केले आहे. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. सुनिल कारंथ यांनी ऑक्सीजन प्रकल्प ही काळाची गरज आहे ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय संस्था स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.