केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आज बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भेट देऊन भाजी विक्री करण्यात येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली.
कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्याच सुरक्षेसाठी एपीएमसी मधील भाजी विक्री इतर दोन किंवा तीन ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या उद्देशाने अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
मागील वेळी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे एपीएमसी येथील भाजी विक्री करण्यासाठी व्यापारी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
परंतु यावेळी अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी सतीश जारकीहोळी बेंगळूरहून परतल्यानंतर थेट बेळगाव एपीएमसी ला भेट देऊन योग्य ती उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी सतीश जारकीहोळी यांच्यासमवेत एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, माजी अध्यक्ष आनंद पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.