Monday, April 29, 2024

/

सतीश जारकीहोळी वाढवत आहेत मराठी मतदारांचा संपर्क

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला प्रारंभ होऊन दोन दिवस उलटले आहेत. आता हळूहळू प्रचाराला जोर चढू लागला असून प्रत्येक उमेदवार प्रचार दौरे काढून मतांची याचना करत आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी विशेषत: बेळगाव उत्तर-दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघातील मराठी मतांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

गेल्या रविवारी दक्षिण बेळगावात मॅरेथॉन प्रचार सभा घेतल्यानंतर ग्रामीण भागातील मराठी गावांमध्ये तेथील मराठी मतदारांशी त्यांनी हिंदीमध्ये संवाद साधून आपल्याला मतदान करण्याची विनंती केली.

बेळगावात मराठी भाषिकांवरच जास्त अन्याय होत आहे. हा अन्याय करणाऱ्यांना आपण सरळ करुया असे सांगुन तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा मी तुमच्या वरील अन्याय दूर करून तुमच्या प्रत्येक समस्या सोडवेण असे अश्वासन ते देताना दिसत आहेत.

 belgaum

आपल्या एका प्रचार सभेमध्ये काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी म्हणाले की, जात -धर्म सोडा आणि विकासाचा विचार करा. रोजगाराचा विचार करा. जाती -धर्माचा विचार करण्यापेक्षा या गोष्टींवर विचार करून मतदान करा. हीच निवडणूक नाही तर पुढील प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण विकासाचा आणि रोजगाराचा विचार करून मतदान केले पाहिजे. जातीधर्माच्या राजकारणाचा उपयोग नाही. त्यामुळे फक्त कांही स्वार्थी लोकांचा फायदा होत असतो हे लक्षात घेतले पाहिजे.Satish jarkiholi

आमच्यासारख्या राबून खाणाऱ्यांचे या जाती-धर्माच्या राजकारणामुळे पोट भरत नाही, आम्हाला काम करावंच लागणार आहे. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. तुमच्या मतांमुळे मी नक्कीच या मतदारसंघाचा खासदार म्हणून तुमच्या सोबत काम करणार आहे. तुमच्या समस्या मला सोडवावयाच्या आहेत. मला माहित आहे की

सतीश जारकीहोळी मुळात यमकनमर्डी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. एकदा विधान परिषद सदस्य (एमएलसी) राहिलेले सतीश जारकीहोळी यांनी मंत्रीपद देखील भूषविले आहे. बेळगावातील बऱ्याच मराठी लोकांशी त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे सध्या त्यांनी पूर्ण क्षमतेने मराठी मतदारांवर आपले संपुर्ण लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बेळगाव लोकसभा मतदार संघातील मराठी भाषिकांची मते ही नेहमीच निर्णायक ठरली आहेत. मराठी भाषिकांची मते ज्या उमेदवाराला पडतात तोच उमेदवार विजयी होतो हा इतिहास आहे.

गेल्या चार निवडणुकांमध्ये मराठी भाषिक मतदारांचा कौल ज्याच्या बाजूने तो उमेदवार निवडून आला आहे, जसे सुरेश अंगडी निवडून आले होते. त्यासाठी यावेळच्या पोटनिवडणुकीमध्ये सतीश जारकीहोळी यांनी मराठीभाषिक मतांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे हे करताना त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीचा वापर केला आहे. मराठी व्यवस्थित येत नसल्यामुळे त्यांनी मराठी भाषिकांबरोबर संवाद साधण्यासाठी ते हिंदी भाषेचा आधार घेत आहेत .

त्याचप्रमाणे प्रारंभी उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रतीक असलेली हिरवी शाल परिधान केली होती. मात्र आता बेळगाव उत्तर -दक्षिण आणि ग्रामीण मतदार संघातील मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हिरवी शाल बदलून त्याऐवजी भगवा फेटा बांधण्यास सुरुवात केली आहे. एकंदर जास्तीत जास्त मराठी भाषिक मते आपल्याला मिळावीत यासाठी सतीश जारकीहोळी यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.