पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. परंतु कर्नाटकात पुन्हात एकदा कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने २८ एप्रिल रोजी होणारी पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, द्वितीय पीयूसी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची , २८ एप्रिलपासून सुरु होणारी प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे,
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ती पुढे ढकलण्यात आली असून वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केली आहे.
विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्रतिनिधी आणि पालक यांच्याशी केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ नये,
विद्यार्थ्यांनी एकाग्रतेसह वार्षिक परीक्षेची तयारी सुरु ठेवावी असे आवाहन देखील सुरेशकुमार यांनी केले आहे.