Sunday, April 28, 2024

/

‘१ नोव्हेंबर’ : मराठी तरुणांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १७ मे रोजी

 belgaum

१ नोव्हेंबर रोजी २०१७ रोजी निघालेल्या काळ्यादिनाच्या फेरीत शहापूर येथे लाल पिवळ्या पताका फाडल्याच्या कारणावरून काही युवकांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर ४३ जणांवर शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गेली ४ वर्षे कामकाज सुरु असून पुन्हा एकदा पुढची तारीख देण्यात आली आहे. या याचिकेवर १७ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

१ नोव्हेंबर २०१७ रोजी निघालेल्या मोर्चादरम्यान शहापूर येथील पंडित नेहरू महाविद्यालयासायमोर लाल पिवळ्या पताका फाडण्यात आल्याच्या आरोपावरून १३ तरुणांना पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर दत्ता यळ्ळूरकर, रामचंद्र पाटील, यशोधन नेसरकर, सचिन कदम, महेश पाटील, अंकुश बाळेकुंद्री, शनूखा चोपडे, संतोष मुचंडीकर, भुजंग लाड, चांगदेव मुचंडीकार, सतीश कुगजी, रोशन पाटील, राहुल कुरणी, राघवेंद्र येळ्ळूरकर, संदीप मोटेकर, राहुल मदन पाटील, गजानन कोटे, बाळू जमादार, लोकनाथ रजपूत, सुरज शिंदोळकर,रवी मिरजकर, श्रीकांत मास्तमर्डी, राजू मजूकर, जयदीप उप्पाशेखर, राजू हित्तलमनी, स्वप्नील देसाई, बाबू भडांगे, श्रीकांत कदम, श्रीनिवास पोल, सचिन पाटील, शंकर जाधव, नारायण पाटील, इंद्रजित पाटील, संदीप कडेमनी, विक्रम मटकेकर, राहुल आनंद पाटील, सुशांत रेडकर, किरण पिसे, विठ्ठल पाटील, संतोष बांडगी, मनोहर काकतकर, शोधन मारुती कंग्राळकर, विजय घाटकर या ४३ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील काही तरुणांना १२ दिवस हिंडलगा कारागृहात डांबण्यात आले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.Mes case 1 st nov

 belgaum

गेली चार वर्षे या खटल्याची सुनावणी होत असून उपरोक्त सर्व तरुणांना नाहक मनस्ताप होत आहे. कर्नाटक सरकार नेहमीच मराठी भाषिक तरुणांना लक्ष्य करून नाहक त्रास देत असते. अशा अनेक खोट्या याचिका आणि खोटे खटले मराठी भाषिकांवर घालण्यात आले आहेत.

२०१७ रोजी झालेल्या या प्रकरणातील युवक गेली चार वर्षे सातत्याने कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. या गोष्टीचा त्यांना नाहक त्रास होत आहे. यासंदर्भात याचिकेवर कामकाज सुरु असून येत्या १७ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.