कोविड ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या संकटप्रसंगी कोविड ग्रस्त रुग्णांना योग्य वेळेत योग्य उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनीही कोविड ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी पुढाकार घेऊन सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट अंतर्गत नोंदणी करून घ्यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. के हरिशकुमार यांनी सर्व खाजगी रुग्णालयांना केली.
सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांनी दोघांनी मिळून या सांसर्गिक रोगाविरोधात आणि या रोगाचा संसर्ग फोफावण्याविरोधात एकवटून काम करावे. तसेच कोविड रुग्णावर योग्य वेळेत उपचार करावेत आणि संपूर्ण परिसर कोविडमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यासाठी खाजगी रुग्णालयांनी सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट अंतर्गत लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
खाजगी रूग्णालयांनी नोंदणी करण्यासाठी
https://sast.karnataka.gov.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. तसेच https://sast.karnataka.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन New empanelment request या लिंक वर क्लिक करावे. या लिंकवर आवश्यक ती माहिती भरून सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्ट अंतर्गत नोंदणी करता येते.
अधिक माहितीसाठी http://arogya.karnataka.gov.in/sast/ या वेबसाईटवर किंवा 1800 425 8330 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी केले आहे.