बेळगाव शहरातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लबच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले. सदर शौचालय महिलांसाठी बांधण्यात आले असून रोटरी जिल्हा गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
उदघाटनानंतर रोटरी जिल्हा गव्हर्नर संग्राम पाटील म्हणाले की, रोटरी ई क्लबने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी एक विशेष शौचालय बांधले आहे. कॅन्टोन्मेंट रुग्णालयात बेळगाव रोटरी-ई-क्लबतर्फे 2 लाख रुपये खर्च करून हे शौचालय स्वच्छता राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि निरोगी राहण्याच्या हेतूने महिलांसाठी खास बांधण्यात आलेले आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्य करणे आवश्यक आहे. यासाठी रोटरी क्लब नेहमीच सज्ज असतो. भविष्यातही अशाच पद्धतीने कार्य करत राहील, असे ते म्हणाले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्व म्हणाले की, रोटरी क्लबने कॅन्टोन्मेंट रूग्णालयात दोन लाख रुपये खर्च करून महिलांसाठी एक विशेष शौचालय बांधले आहे . रोटरी क्लब नेहमीच समाजासाठी उपयुक्त अशा सेवेला प्राधान्य देऊन सहकार्य करीत आहे, याचा मला आनंद आहे .
या लोकार्पण कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सहाय्यक संचालक अजया हेडा, रोटरी ई क्लबचे अध्यक्ष नागटिळक गणिकोप्प, सचिव कविता कंगानी, प्रख्यात समाजसेवक किरण निपाणीकर , हॉस्पिटलचे कर्मचारी आणि छावणी परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.