बेळगाव जिल्ह्यात दररोज नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडत असून शुक्रवारी पुन्हा २५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७२९१ इतकी झाली आहे.
आजपर्यंत ५७२४४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील २९२१९ जणांनी होम क्वारंटाईन अवधी पार केला आहे. तर २११ रुग्ण अद्याप रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. २३९४८ रुग्णांची १४ दिवसांचा अवधी आणि ५१९०६२ जणांनी २८ दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केला आहे. आजपर्यंत ५७१३४८ जणांचे नमुने घेण्यात आले असून यापैकी ५३७३१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज २५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आजपर्यंत ३४४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. २६७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर अद्याप २११ जणांवर उपचार सुरु आहेत. आज नोंद झालेल्या २५ रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील १४, गोकाक मधील २, अथणी मधील २, सौंदत्ती येथील २, चिकोडी येथील , रामदुर्ग येथील १ आणि रायबाग येथील एका रुग्णाचा समावेश आहे.