Wednesday, May 8, 2024

/

बेळगाव परिवहन विभागाला दररोज 5 ते 6 लाखांचा फटका!

 belgaum

लाल-पिवळ्या ध्वजासह कन्नड -मराठी फलक प्रकरणांमुळे बेळगाव -कोल्हापूर बस सेवेवर विपरीत परिणाम झाला असून यामुळे बेळगाव परिवहन विभागाला दररोज 5 ते 6 लाखांचा फटका बसत आहे.

कन्नड -मराठी फलक प्रकरणांमुळे बेळगाव -कोल्हापूर बस सेवेवर परिणाम झाला असून बेळगाव बस स्थानकातून धावणाऱ्या बसेस कोल्हापूर बस स्थानकात न जाता बाहेरूनच परस्पर धावत आहेत. महाराष्ट्रातून बेळगावकडे धावणाऱ्या बसेसची संख्यादेखील कमी झाली आहे. कोल्हापूर आगाराच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कर्नाटक -महाराष्ट्र बस सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात होणार 142 बससेवांवर परिणाम झाल्यामुळे बेळगाव परिवहन विभागाला दररोज 5 ते 6 लाख रुपयांचा फटका बसत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, संकेश्वर, चिक्कोडी, हुक्केरी आदी विभागांना चांगला महसूल मिळतो.

 belgaum

मात्र आठ दिवसापासून कर्नाटक -महाराष्ट्र आंतरराज्य बस सेवा विस्कळीत झाल्याने महसुलावर परिणाम झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व आगारांचा महसूल महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेसवर अवलंबून आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या आगारांचे उत्पन्न घसरले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.