Tuesday, May 7, 2024

/

टिळकवाडीतील वृद्धेची तब्बल 88 लाखाला लुबाडणूक!

 belgaum

सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत असून लंडन होऊन किंमती भेटवस्तू पाठविल्याचे सांगून बेळगाव येथील एका वृद्धेला तब्बल 88 लाख रुपयांना लुबाडण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

टिळकवाडी येथील एका वृद्धेने यासंबंधी शहरातील सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. कोट्यावधी रुपयांची भेटवस्तू पाठविण्यात आल्याचे सांगून आपल्याकडून तब्बल 88 लाख रुपये उकळण्यात आले असल्याची तक्रार सदर वृद्धेने केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ चार महिन्यात संबंधित महिलेला गंडविण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, चार महिन्यापूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर आलेली एक फ्रेंड रिक्वेस्ट सदर वृद्धेने एक्सेप्ट केली. आपण लंडनमध्ये प्रसिद्ध डेंटिस्ट (दंतवैद्य) असल्याचे सांगून भामट्याने या वृद्धे बरोबर चॅटिंग सुरू केले. एक-दोन दिवसात मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर व्हाट्सअपवर मेसेज सुरु झाले. या पद्धतीने सातत्याने संपर्कात राहून त्या दंतवैद्य याने या वृद्धेशी भावनिक नाते निर्माण केले. त्यानंतर त्या भामट्याने 27 डिसेंबर 2021 पासून भेटवस्तूचा फंडा सुरू केला. एक दिवस आपण तुमच्यासाठी एक मोठी भेट वस्तू पाठवत आहे. एका कुरिअर कंपनीकडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल ते सांगतील तसे करा म्हणजे लवकरात लवकर तुमच्या हातात मी पाठवलेली किमती भेटवस्तू पोहोचेल असे त्या भामट्याने सांगितले.

 belgaum
Cyber police station
Cyber police station

पुढे आपण कुरियर कंपनीतून बोलते असे सांगत 18 जानेवारी 2021 रोजी एका महिलेने सदर वृद्धेशी संपर्क साधला. तुमचे गिफ्ट पोहोचले आहे त्यासाठी तुम्हाला 35,500 रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्या वृद्धाने त्वरित सूचनेचे पालन करत पैसे भरले. पुढे इन्कम टॅक्स क्लिअरन्स, आयएफसी कोड, पर्सनल एक्सेस सर्टिफिकेट आदी वेगवेगळी कारणे देत 35,000 रुपयांपासून 7.25 लाख रुपयांपर्यंत तब्बल वीस वेळा सदर वृद्धेकडून पैसे उकळण्यात आले.

कालांतराने आपण फसलो गेलो हे लक्षात येताच वृद्धेला धक्काच बसला आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास कार्य हाती घेतले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.