उन्हाळ्याला सुरुवात होताच हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतो. आता अघोषित वीजपुरवठयामुळे ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात येत असून हा वीज पुरवठा कधी एकदा सुरळीत होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सध्या कोरोणामुळे शाळा कॉलेज यांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र कोरूना काहीअंशी नियंत्रणात आल्याने आता शाळा कॉलेज सुरू झाले आहेत. त्यामुळे लवकरच परीक्षा होणार आहेत. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना विजेची गरज असते. मात्र उपस्थित वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे.
ग्रामीण भागात अघोषित वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. पाणी पाजण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. पाणी पाजताना अचानक वीज खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ वाया जात आहे.
त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागले आहे. जर वीज पुरवठा खंडित करायचा असेल तर वृत्तपत्रातून तशी बातमी द्यावी असेही अनेक जाणकारांनी म्हटले आहे. तेव्हा हेस्कॉमने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.