ताशिलदार गल्ली येथे असलेल्या गेंजी टॉवर मध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार अनिल बेनके, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि शहर उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यात भगवा आणि शिवमूर्तीवरून चांगलीच हमारी तुमरी जुंपली.
व्यासपीठावरून बोलताना युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, कि ज्या मराठी माणसाच्या जीवावर आणि मराठी मतांच्या जोगव्यावर लोकप्रतिनिधी निवडून आले, त्यांना छत्रपती शिवरायांचा आणि भगव्याचा मान राखता आला नाही. गल्ली पासून दिल्लीपर्यंत हिंदुत्ववादी विचारसरणीचा झेंडा घेऊन, शिवरायांच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक मणगुत्ती, पिरनवाडी प्रकरणावर मौन पाळले. मनपा समोरील हटविण्यात आलेल्या भगव्याबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपण खरेच शिवभक्त आहोत का? हा प्रश्न स्वतःच्या मनालाच विचारावा. बेळगावमधील शिवजयंतीला मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त बेळगावच्या शिवभक्तांची उदाहरणे देतात. परंतु बेळगावची सध्याची परिस्थिती पाहता सर्व विचित्र असे स्वरूप झाले आहे.
शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही बोट लावू नका, असे सांगणारे शिवराय आज त्याच शिवरायांच्या राज्यात शेतकरी अडचणीत आहे. आणि त्याच शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शिवरायांच्या तत्वांचा विसर पडला आहे. ना भगव्याचा मान ना शिवरायांचा मान. लोकप्रतिनिधींना कशाची बूज नाही. पदाची आणि पक्षाची सीमा ओलांडून, गहाण टाकलेला स्वाभिमान जागे करण्याची गरज असल्याचा टोला शुभम शेळके यांनी लगावला.
शुभम शेळके यांच्या जोरदार टोलेबाजीनंतर आमदार अनिल बेनके यांना ही गोष्ट खटकली. आणि त्यानंतर आमदार अनिल बेनके यांनी शुभम शेळके यांना प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिवजयंती उत्सवादरम्यान राजकारण आणू नये. शिवरायांचा अपमान आम्हालाही सहन होणारा नाही. शिवरायांच्या व्यासपीठावर राजकारण येईल, त्यावेळी आपणही मराठा म्हणून शड्डू ठोकण्यास आपण तयार असून योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देण्यास आपण समर्थ असल्याचे आमदार अनिल बेनकेंनी सांगितले.
आज दिवसभर अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. परंतु गेंजी टॉवर येथे झालेल्या कार्यक्रमात बेनके विरुद्ध शेळके यांच्यात झालेली हमरी – तुमरी चर्चेचा विषय ठरला.
गेंजी टॉवर ताशीलदार गल्ली बेळगाव यांच्या इमारती वरील शिव मूर्ती समोर शिवजयंती कार्यक्रमात शुभम शेळके यांच्या भावनिक भाषणाला आमदार बेनके यांचं प्रत्त्युतर-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1328863260804597&id=375504746140458
शुभम शेळके यांचे आमदार अनिल बेनके यांना आवाहन
https://www.facebook.com/livebelgaum/videos/736790540542630/
https://www.facebook.com/livebelgaum/videos/736790540542630/
https://www.facebook.com/livebelgaum/videos/736790540542630/
https://www.facebook.com/livebelgaum/videos/736790540542630/
https://www.facebook.com/livebelgaum/videos/736790540542630/