Friday, May 17, 2024

/

अट्टल दरोडेखोराला अटक; माळमारुती पोलिसांची कारवाई

 belgaum

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर ट्रॅक्टर शेजारी झोपलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याच्याजवळील मोबाईल फोन हिसकावून फरारी झालेल्या दरोडेखोराला अटक करण्यात माळ मारुती पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेला दरोडेखोर हा न्यू गांधी नगर येथील रहिवासी असून संतोष बाळाप्पा बिचगत्ती असे त्याचे नाव आहे. २६ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ट्रॅक्टरजवळ झोपलेल्या व्यतीवर प्राणघातक हल्ला झाला होता. तसेच त्याच्याजवळील मोबाईल फोनची देखील चोरी झाली होती.Police theft

यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी मार्केट एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय सुनील पाटील

 belgaum

यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास घेत आरोपीचा शोध लावला असून संबंधित आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.