हिंडलगा कारागृहातून रावडी स्टाईलने आलेल्या फोनवरून धमकी दिल्याच्या प्रकारानंतर सुमारे पन्नास हुन अधिक पोलिसांची तुकडी हिंडलगा कारागृहाकडे रवाना झाली.
अचानकपणे आलेले पन्नास पोलीस कारागृहात शिरले खरे, तपासही घेतला, शोधाशोध झाली… अन या साऱ्या प्रकारानंतर पोलिसांना एक मोबाईल संच हाती लागला.
या साऱ्या प्रकारची पार्श्वभूमी अशी कि, हिंडलगा कारागृहातून कोणत्यातरी रावडी स्टाईल कैद्याने फोनवरून धमकी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रसारमाध्यमांनी कारागृहातून फोन कसा आला? या प्रश्नावर जोर धरला.
कारागृहातील कैद्याकडे मोबाईल कसा? या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत तडक हिंडलगा कारागृहाकडे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. हिंडलगा कारागृहात पोहोचलेल्या पोलिसांनी संपूर्ण कारागृह पिंजून काढले. आणि या दरम्यान पोलिसांच्या हाती एक मोबाईल संच लागला.
डीसीपी विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली २ डीसीपी, २ एसीपी, ८ पीआय, आणि ५५ इतर पोलीस कर्मचारी हिंडलगा कारागृहाकडे दाखल झाले. पोलिसांच्या या तुकडीने हिंडलगा कारागृहाची संपूर्ण तपासणी केली. दरम्यान, या तपासणीवेळी मिळालेल्या मोबाईल संचाविषयी पोलीस माहिती घेत आहेत.