जिल्हा रुग्णालयाच्या डी ग्रुप कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे. कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता आणि इतर सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत आहेत.
प्रत्येकवेळी आश्वासने देऊन हि आंदोलने तात्पुरती शमविण्यात येतात. परंतु कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयी-सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासाठी आज पुन्हा या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
आपण करत असलेल्या सेवेची दखल घेऊन सरकारने आपल्याला सर्व सेवा सुविधा द्याव्यात यासाठी डी ग्रुप कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या अनेक वर्षापासून बीम्समध्ये कार्यरत असणारे हे कर्मचारी सरकारी सुविधांपासून वंचित राहिले आहेत.
या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागणीबाबत यापूर्वीदेखील आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नसल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली.