माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी वकिलांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ संतप्त वकिलांनी आंदोलन छेडून वाहतूक ठप्प केल्याचा प्रकार आज सकाळी शहरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार माझ्या मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी एका प्रकरणात वकिलांना अर्वाच्च शिवीगाळ करून असभ्य वर्तन करतो वकिलांचा अपमान केला याबाबतची माहिती मिळताच बेळगाव बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अर्थात वकिलांनी आक्रमक पवित्रा घेतला वकिलांना शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या समस्त वकील वर्ग रस्त्यावर उतरला परिणामी जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालया समोरील प्रमुख दुतर्फा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संतप्त वकिलांची भेट घेतली. तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या समस्त वकीलवर्गाने माळ मारूती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या वर्तणुकीचा निषेध करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान वकील वर्गाने अचानक छेडलेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ आणि डी सी विक्रम आमटे यांनीं सदर पोलीस निरीक्षकान कार्यालयात बोलावून माफी मागायला लावतो असे आंदोलनस्थळी जाऊन विनंती केली संतप्त वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांला आंदोलन स्थळी आंदोलन स्थळी बोलावून माफी मागायला लावा अशी भूमिका घेतली होती. सकाळी 11 ते दीड पर्यंत आंदोलन सुरू होते.
पोलीस निरीक्षका विरोधात वकिलांचा ठिय्या आंदोलन