Thursday, April 25, 2024

/

कर्जबाजारी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

 belgaum

कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना होन्निहाळ (ता. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे.

बाळू काशप्‍पा केंगेरी (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नांव आहे. बाळू याने मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते.

या कर्जाची परतफेड करता येत नसल्यामुळे जीवनाला कंटाळलेल्या बाळू केंगेरि याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.