Saturday, May 4, 2024

/

विविध मराठा संघ संस्थांच्या वतीने शंकरगौडा पाटील यांचा सत्कार

 belgaum

राज्य सरकारने मराठा विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने या महामंडळाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी ५० कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असलेल्या मराठा समाजाचा आपल्याला आदर्श असून सरकारने जाहीर केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाने आपला विकास साधावा, असे वक्तव्य कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी केले आहे.

बेळगावमधील विविध मराठा संघटनांच्यावतीने आज त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

मनोहर कालकुंद्रीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शंकरगौडा पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्नाटक सरकार मराठा समाजाच्या विकासाबद्दल सकारात्मक पद्धतीने पाऊले उचलत असून दावणगिरी येथेही शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचीही सुधारणा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यभर मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने पाऊले उचलत आहे, अशी माहिती शंकरगौडा पाटील यांनी दिली.Maratha  shankr gowda

 belgaum

या कार्यक्रमात विविध मराठा संस्थांच्या वतीने शाल,पुष्पहार, पुष्पगुच्छ व फेटा बांधून शंकरगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना काळात माधुरी जाधव यांनी केलेल्या कार्याचे शंकरगौडा पाटील यांनी विशेष कौतुक केले.

बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, मराठा बँक, मराठा मंदिर ट्रस्ट,बेळगाव कुस्ती संघटना, मराठा जागृती मंच, बेळगाव रोलर स्केटिंग असोसिएशन, मंगाई देवस्थान, वेदांत सोसायटी, बेळगाव पत्रकार संघ, उचगाव साहित्य संघ, हेल्प फॉर नीडी,बेळगाव कोल्ड्रिंक असोसिएशन यांच्यासह विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शंकरगौडा पाटील यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाला माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ॲड. कमलकिशोर जोशी, बाळासाहेब काकतकर,गोपाळराव बिर्जे, शिवाजीराव हंगिरगेकर, प्रकाश येजरे, सुधीर बिर्जे,बेळगाव मराठी पत्रकार मनोहर कालकुंद्री,सुहास हुद्दार,राजेंद्र पोवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संदीप खन्नुकर यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.