Sunday, April 28, 2024

/

सार्वजनिक वाचनालयावर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

 belgaum

सार्वजनिक वाचनालयाच्या बाबतीत वाद सुरु असल्याची माहिती नुकतीच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली असतानाच सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

१७३ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयावर अध्यक्षपदी सौ. सुनीता साईनाथ मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी नेताजी नारायण जाधव, मानद कार्यवाहपदी रघुनाथ भरमाजी बांडगी व सहकार्यवाहकपदी ऍड. आय. जी. मुचंडी यांची एकमताने निवड करण्यात आली.Sarvjanik vachanalya

या निवडीचा ठराव सदस्य वाय. एम. तारळेकर यांनी मांडला. या ठरवलं सदस्य अभय याळगी यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य गोविंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार डी. २३ डिसेंबर रोजी झालेल्या नवीन कार्यकारी मंडळाच्या बैठकीत उपरोक्त पदाधिकाऱ्यांची सण २०२०-२१ या एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

 belgaum

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवडीबाबत मनोगत व्यक्त करून कार्यकारी सदस्यांचे आभार मानले. सदर बैठकीला इतर सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.