प्रत्येक वेळी आमच्या विरोधात वादग्रस्त विधाने करणारे सिद्धरामय्या आमच्यावर खूप प्रेम करत असतील, यासाठीच सातत्याने आमच्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आमच्या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ठेवतात, असा टोला आज नलीन कुमार कटील यांनी लगावला आहे.
बेळगावमधील सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सिद्धरामय्या यांचे आमच्यावर खूप प्रेम असून काळ विधान परिषदेत गोंधळ घालण्याच्या विचारात असलेले, भाजप आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असलेले काँग्रेस पक्षाचे नेते हे कायदेतज्ञांचा सल्ला घेऊनच प्रथमच कायदेशीर आंदोलन केले असल्याची उपहासातमक टीका नलीन कुमार कटील यांनी केली. काँग्रेसने देशात, राज्यात अधिकार मिळविण्यासाठी गुंडगिरी करण्यास सुरुवात केली असून आजपर्यंतच्या इतिहासात अशा गोष्टी अनेकवेळा झाल्या असल्याची टीकाही त्यांनी केली. १७ आमदार भाजपच्या दिशेने येत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत सुधाकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. विधानसभेतही त्यांनी गुंडगिरी करणे सोडले नाही.
संपूर्ण देशात विधानसभेत असा प्रकार होण्याची हि पहिलीच वेळ असून उपसभापतींना बाहेर हाकलवून देऊन सभापतींवर अविश्वास ठराव दर्शविण्याचा हेतूनेच हा सारा खटाटोप करण्यात आला आहे, असा आरोप नलीन कुमार कटील यांनी केला.
काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही. कायदेशीर लढाईच्या नावावर आणि कोणतेही अधिकार नसल्याच्या रागातून आग लावण्याचे कार्य काँग्रेस करत आहे. प्रत्येक ठिकाणी गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतरही असे अनेक प्रकार केले आहेत.
परंतु ते यशस्वी झाले नाहीत. काँग्रेसच्या आंदोलनांना जनतेचा पाठिंबा नाही. केवळ आग लावण्याची प्रवृत्ती काँग्रेसमध्ये असून अधिकारात असताना भ्रष्टाचार आणि अधिकार नसताना आग लावण्याचे कार्य हे नेहमीच काँग्रेस करत आले आहे, अशी टीका त्यांनी केली.