Thursday, May 2, 2024

/

बेळगावात आजही बस बंद-डोक्यावर चप्पल ठेवत आंदोलन

 belgaum

बेळगावात राज्य परिवहन मंडळाच्या आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशी देखील बस स्थानकावर आंदोलन सुरू आहे कर्मचाऱ्यांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही यावर तोडगा निघाला नसल्याने शनिवारी देखील बेळगावातील बस सेवा ठप्प असणार आहे.

आंदोनलाच शनिवार हा दुसरा दिवस असून परिवहन खात्याचे कर्मचारी आक्रमक होऊन धरणे आंदोलन करताना दिसत आहेत.अनेक शेतकरी नेत्यांनी देखील या परिवहन खात्याच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शनीवारी डोक्यावर चप्पल ठेऊन घेत घोषणाबाजी करत आंदोलनाची सुरुवात झाली आहे.राज्य सरकार आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत आहे.

 belgaum

शुक्रवारी सकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली होती रात्रभर देखील हे आंदोलन सुरूच होते आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या शेतकऱ्यांनी परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांना बस स्थानकात जेवण बनवले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.