Saturday, May 4, 2024

/

अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्याला अटक

 belgaum

यमकनमर्डी पोलिसांनी अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या युवकाला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 61,896 रु. किमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील भाग्यलक्ष्मी ढाब्याजवळ अवैधरित्या मद्यविक्री करताना आरोपीला पकडण्यात आले आहे. सिद्राम मुत्यानट्टी (रा. हुक्केरी तालुका, बेनकनहोळी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या कारवाईत यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे
सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पीएसआय रमेश पाटील एस. एस. अरबल्ली, एम. व्ही. नवी, ए. एस. जैनापूर हे सहभागी झाले होते

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.