Sunday, April 28, 2024

/

समाधानाची बाब : जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या झाली 196

 belgaum

बेळगांव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य खात्याच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत कमी झाली असून जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आज चक्क 200 पेक्षा कमी झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत जिल्ह्यात अवघे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,211 झाली आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने आज मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार मंगळवार दि. 29 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 3,76,992 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 42,427 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 196 आहे.

काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 42,735 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 2,91,634 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 3,75,901 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 26,211 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज मंगळवारी नव्याने आढळलेल्या 6 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 3,43,285 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 196 आहेत. त्याचप्रमाणे 4,381 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

 belgaum

जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 25,673 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आज मंगळवारी आढळलेल्या 6 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगांव तालुक्यातील 4 तसेच हुक्केरी व सौंदती तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाचा नवा विषाणू जगभरात हाहाकार माजवत असताना बेळगांव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत असून जिल्हा आरोग्य खात्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.