Friday, May 3, 2024

/

बेळगांवात बुडा हाती घेणार 28 कोटींची रस्ते विकास कामे

 belgaum

बेळगांव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाने बेळगांव दक्षिण मतदार संघातील विविध रस्त्यांच्या विकासकामांसाठी एकूण 28,62,04,356.40 रुपये खर्चाच्या विकास कामांच्या निविदा काढल्या आहेत.

बुडाच्या या प्रकल्पाअंतर्गत बेळगांव दक्षिणमधील विविध रस्त्यांच्या विकासासाठी पुढीलप्रमाणे निधी खर्च केला जाणार आहे. राणी चन्नम्मानगर, भवानीनगर, गोडसेवाडी आणि पार्वतीनगर येथील रस्त्यांच्या विकासासाठी 4,86,26,320.46 रुपये.

शहापूर येथील मठ गल्ली, कचेरी गल्ली, आणि ओम नगर येथील रस्त्यांसाठी 4,59,24,576.41 रुपये. खासबाग टीचर्स कॉलनी, उप्पार गल्ली, उप्पार गल्ली पॅसेज रोड, मारुती गल्ली, नागेंद्र कॉलनी, राघवेंद्र गल्ली, बाजार गल्ली, जुने बेळगावातील अंतर्गत रस्ते, जोशी गल्ली व बसवान गल्ली रस्त्यांसाठी 4,84,16,998.68 रुपये.

 belgaum

अनगोळ कुंभार गल्ली, लक्ष्मी गल्ली, बेंदूर गल्ली, नाथ पैनगर शिवशक्तीनगर, बाबले गल्ली, स्वामी विवेकानंदनगर, पाटील गल्ली, वर्धाप्पा गल्ली, साळेश्वर देवस्थान रोड, तांजी गल्ली आणि अरिहंत मंदिर रोड या रस्त्यांसाठी 4,99,27,635.66 रुपये. नाझर कॅम्प, आनंदनगर, संभाजीनगर,

अंनापूर्णेश्वरीनगर, केशवनगर, बाळकृष्णनगर, विष्णू गल्ली, देवांग नगर वडगाव -शहापूर, श्री विठ्ठल मंदिर रोड, राजवाडा कंपाउंड रोड बेळगांव (पार्ट -2) 494920667.58 रुपये. नाझर कॅम्प, आनंदनगर, संभाजीनगर, अंनापूर्णेश्वरीनगर, केशवनगर, बाळकृष्णनगर, विष्णू गल्ली, देवांग नगर वडगाव -शहापूर, श्री विठ्ठल मंदिर रोड, राजवाडा कंपाउंड रोड बेळगांव (पार्ट -1) 4,38,18,157.61 रुपये.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.