Friday, May 10, 2024

/

एडीजीपी अलोक कुमार झाले सायकलवर स्वार

 belgaum

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित असलेले पोलीस अधिकारी एडीजीपी अलोक कुमार आज बेळगावमध्ये सायकल वर स्वार होऊन शहरात फेरफटका मारताना दिसून आले. औचित्य होते ते केएसआरपी उत्सवाचे!

आज बेळगावमध्ये होणाऱ्या केएसआरपी उत्सवाच्या निमित्ताने बेळगावमधील प्रमुख ठिकाणी या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल फेरीत एडीजीपी अलोक कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

सुवर्णसौधपासून आज सकाळी सकाळीच सुरु झालेल्या या सायकलफेरीत बेळगाव पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कोब्रा, आयटीबीटी ट्रेनिंग सेंटरचे अधिकारी, तसेच बेळगावमधील विविध संघ संस्था या सायकल फेरीत सहभागी झाल्या होत्या. ही सायकल फेरी सुवर्ण विधानसौधपासून सुरु होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली होती.Adgp alok kumar

 belgaum

यावेळी अलोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले कि, सध्या प्रत्येकाच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होत असून प्रत्येकाने सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे सायकल चालवावी.

दररोज चार ते पाच किलोमीटर सायकल चालविल्याने आपले आरोग्य उत्तम राहते. याशिवाय सायकलमुळे प्रदूषणही रोखण्यास मदत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.