Tuesday, May 14, 2024

/

कॅन्टोन्मेंट भागात लवकरच सुरू होणार प्ले सेंटर – सीईओ बर्चस्वा

 belgaum

नॅशनल प्ले सेंटर योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्राप्रमाणे बेळगांव कॅन्टोन्मेंट भागात प्ले सेंटर चालविण्याची सूचना महिला व बालकल्याण खात्यातर्फे संबंधित एनजीओला दिली जाणार आहे, अशी माहिती बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बर्चस्वा यांनी दिली.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासीक सर्वसाधारण बैठक आज सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बर्चस्वा यांनी बैठकीत ज्या तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली त्याची माहिती दिली. नॅशनल प्ले सेंटर योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका एनजीओ कडून प्ले सेंटर चालविले जात आहे त्याप्रमाणे बेळगाव कॅन्टोन्मेंट भागात प्ले सेंटर चालविण्याची सूचना महिला व बालकल्याण खात्यातर्फे संबंधित एनजीओला दिली जाणार आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या प्ले सेंटरमुळे नोकरदार महिलांना आपली मुले प्ले सेंटरमध्ये हे धाडून निवांतपणे आपल्या कामावर जाता येणार आहे, असे बर्चस्वा यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बंगलो एरियातील अनाधिकृत बांधकाम अथवा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी लवकरच एक सर्वेक्षण समिती स्थापन करण्यात येणार आहे. ओल्ड ग्रँट बंगले अर्थात निवासी बंगले हे फक्त निवासासाठी वापरले जावेत असा नियम आहे. परंतु कांही लोक व्यावसायिक कामासाठी या बंगल्याचा व्यावसायिक वापर असल्याच्या तक्रारी आहेत.Ceo cant barchssva

 belgaum

यासाठी संबंधित समिती पाहणी दौरा करून बंगले मालकांकडून नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना? याची शहानिशा करेल. कॅन्टोन्मेंट हद्दीत सुमारे 150 बंगले असून ही समिती फक्त पाहणी करणार असून आणि अन्य कोणताही अधिकार या समितीकडे नसतील. तसेच सदस्यांच्या विरोधामुळे सर्वसाधारण बैठकीतील ठरावामध्ये असणारा रिझमशन हा शब्द काढून टाकण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव महापालिकेचे थिमय्या रोड आणि खानापूर रोड येथे पाईप लाईन घालण्याचे जे काम परवानगी अभावी अर्धवट अवस्थेत आहे, त्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. थिमय्या रोडच्या नुतनीकरणाचे काम आम्ही अलीकडेच केले असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तथापि कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेऊन संबंधित रस्त्यांच्या ठिकाणच्या पाईपलाईन घालण्याच्या कामास परवानगी दिली जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.