हा एक मानसिक विकार आहे. यामध्ये माणूस काटेकोरपणाबाबत स्वतःबरोबर इतरांच्या बाबतीतही आग्रही राहतो. ती गोष्ट घडली नाही तर अस्वस्थ होतो आणि त्याच विचारांत गुंततो एकच गोष्ट सतत आणि खूप वेळ करत राहतो. ती करतानाही चिंता त्याला सोडत नाही. हा आजार बरा करण्यासाठी समुपदेशक मनोविकृती जज्ज्ञ आणि होमिओपॅथी पुष्पौषधी तज्ज्ञ यांचे उपचार महत्वाचे ठरतात.
पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणार्या एक प्राध्यापिका!
लहानपणापासून टापटिपीचा, व्यवस्थितपणाची आवड, कुठलंही काम अगदी परफेक्टच करणार. माहेेरी या सवयीचं सगळ्यांना जाम कौतुक पण नंतर नंतर या परफेक्शनचं असं काही स्तोम झालं की त्यांना स्वतःचीच भीती वाटू लागली. आपण आपलं काम काटेकोर केलं नाही तर काही वाईट घडेल असं वाटायला लागलं. लेक्चर संपल्यावर स्टॉफरूममध्ये पुस्तकं एका कडेनं व्यवस्थित ठेवायची. मोबाईल अगदी सरळ रेषेतच ठेवायचा. पेनचं टोपण परत परत व्यवस्थित लावायचं. साडीचा पदर पुनः पुन्हा व्यवस्थित करायचा.
चेहरा सारखा आरशात बघायचा. शकून अपशकून यांच्या भ्रामक कल्पना मनात रूजवायच्या असंच झालं पाहिजे, तसच केलं पाहिजे असा हेकेखोरपणा करायचा. घरचे लोक तर एकदम परेशान! त्यामुळे सहकारी, मैत्रिणी टिंगल करू लागले. टाळू लागले, पती, मुलं, कंटाळून गेली होती.
परिपूर्णतेची आवड हेकेखोरपणा मध्ये रूपांतरीत झाली होती. त्याला कारणीभूत होती, असुरक्षिततेची भावना. ऑबसेशन म्हणजे एखादी गोष्टी आपण ठरवलेल्या पध्दतीनेच झाली पाहिजे. यांचे अतिशयोक्त बंधन लादून घेणे अशा बंधनामुळे ती गोष्ट न होणे ही त्या व्यक्तीला सहन करण्यापलीकडची वाटायला लागते. त्या ठरवलेल्या पध्दतीचा निकष गाठण्याच्या धडपडीतून अनिवार्य वर्तन केले जाते. काही व्यक्तींना स्वच्छतेचा असा सोस असतो. दुसर्यांनी हाताळलेल्या वस्तु परत परत धुवून घेणे, न वापरलेले कपडेसुध्दा सारखे धुणे, हात सारखे सारखे धुणे इ. इ. हा विकार ही ओसीडीमध्ये येतो.
मनातील अपराधीपणाची भावना, असुरक्षितपणाची भावना, घुसमट या ओसीडीमार्फत बाहेर पडतात.
www.thebachflower.com
9916106896
9964946918
लक्षणे-
अतिरिक्त चिंता आणि काळजी
समस्यांकडे पाहण्याचा अवास्तव दृष्टिकोन
सततचा अस्वस्थपणा, असमाधान
स्नायुदुखी, डोकेदुखी
कामात लक्ष न लागणे
अकस्मात शौचाला जाण्याची घाई होणे
अस्वास्थ, अरूची, अस्वारस्य इ.
उपचार-
काहीवेळा मनोविकृतीतज्ज्ञांकडून मॉडर्न मेडिसिन घेऊन विकार कंट्रोलमध्ये आणावा लागतो. रूग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत आल्यावर समुपदेशनाचा प्रभाव पडू शकतो. विकार पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी मॉडर्न औषधांच्य बरोबरीनेच होमिओपॅथी व पुष्पौषधींच
अवलंब करावा लागतो. राहणीमानात बदल करावे लागतात. विचार बैठक बदलावी लागते. होमिओपॅथीने विकार पूर्ण बरा होतो.